आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The 'dehati Aurat' Comment Attributed To Him Is Learnt To Have Upset Pakistan Prime Minister Nawaz Sharif, Who In Immediate Damage control

तसे बोललोच नाही; 'देहाती औरत'वरुन नवाज शरीफ यांचे 'डॅमेज कंट्रोल'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा 'देहाती औरत' असा उल्‍लेख केला नसल्‍याचे पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्‍पष्‍ट केले आहे. याप्रकरणावरुन सध्‍या मोठा वाद निर्माण झाला आहे. त्‍यामुळे नवाज शरीफ यांनी डॅमेज कंट्रोल करण्‍याचा प्रयत्‍न सुरु केला आहे. यासाठी त्‍यांनी मनमोहन सिंग यांना एक संदेश पाठवून असे कुठलेही वक्तव्‍य केलेले नसल्‍याचे सांगितले.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 'देहाती औरत'बाबत कळताच नवाज शरीफ यांनी त्‍यांच्‍या अतिशय विश्‍वासू अधिका-यांना तत्‍काळ भारतीय अधिका-यांना संपर्क करण्‍याचे निर्देश दिले होते. परराष्‍ट्र सचिव जलिल अब्‍बास जिलानी यांच्यावर संदेश देण्‍याची जबाबदारी सोपविण्‍यात आली होती. त्‍यांनी सुरक्षा सल्‍लागार शिवशंकर मेनन यांना संपर्क करुन पाकिस्‍तानची भूमिका स्‍पष्‍ट केली.

शिवशंकर मेनन यांनीही त्‍यांना सांगितले, की याप्रकरणाची आपल्‍याला माहिती असून अशा वक्तव्‍याची सत्‍यता पडताळण्‍यात आली आहे. मनमोहन सिंग यांनाही याबाबत माहिती देण्‍यात आली आहे. मेनन यांच्‍या उत्तरानंतर नवाज शरीफ यांना मोठा दिलासा मिळाला.


काय आहे प्रकरण... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...