आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The First News Report On The L.A. Earthquake Was Written By A Robot

रोबोटने लिहिलेले वृत्त प्रकाशित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकन दैनिक ‘दि लॉस एंजलिस टाइम्स’हे रोबोटने पत्रकार, लेखकाने लिहिलेले वृत्त प्रकाशित करणारे पहिले दैनिक ठरले आहे. या रोबोटने भूकंपाशी संबंधित वृत्त लिहिले होते. पत्रकार व प्रोग्रामर केन श्वेन्के याने एक प्रोग्राम विकसित केला असून हा प्रोग्राम भूकंप होणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्यावर छोटा बातमीवजा लेख लिहून देतो. श्वेन्के यांनी सांगितले की, ही बातमी केवळ तीन मिनिटांत वेबसाइटवर प्रकाशित झाली होती. जगभरातील न्यूजरूममध्ये ‘रोबो - र्जनालिझम’ वाढत आहे. द एलए टाइम्स ने हे तंत्रज्ञान शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा रोबोट द लॉस एंजलिस टाइम्स, यूएस जिऑलॉजिकल सव्र्हेसारख्या विश्वासार्ह स्रोतांकडून डाटा कलेक्ट करतो व आधीच तयार केलेल्या लेखाच्या आराखड्यात ती माहिती फिड करतो. या शिवाय हा प्रोग्राम शहरात होणार्‍या गुन्हेविषयक बातम्याही तयार करतो. या बातम्यांमधून कर्मचारी महत्त्वाच्या बातम्यांची निवड करतात. त्यातून त्यांना योग्य माहिती प्राप्त होते.

रोबोटचे डाटा कलेक्शन
श्वेन्के यांनी सांगितले की रोबोटद्वारे तयार केलेल्या बातम्या खर्‍याखुर्‍या पत्रकारांची जागा घेऊ शकणार नाहीत. कारण हा रोबोट केवळ उपलब्ध डाटा लवकरात लवकर संकलित करून तो संबंधित कर्मचारी, वार्ताहरांची मदत करू शकेल. या प्रक्रियेत त्यांचा बराच वेळ वाचू शकतो. विशेषत: चांगल्या प्रकारे माहिती संकलित करून विशेष वृत्त, लेख लिहायचख असेल तर अशा वेळी या रोबोटने संकलित केलेली माहिती त्यांना उपयुक्त ठरू शकेल. हा पत्रकारांची नोकरी काढून घेणार नाही. परंतु त्यांचे काम सुलभ करण्यास त्यांना मदत करेल.