आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान उड्डाणांवरील नियंत्रणाचे फंडे, हवामानासोबतच नफ्या-तोट्याचे गणितही महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील बर्फाळ वादळांमुळे फेब्रुवारीत एका आठवड्यातच 14,000 उड्डाणे रद्द करावी लागली. 1987 नंतर हिवाळ्यात एवढी उड्डाणे रद्द करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. 2 लाख 90,000 उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा विलंबाने गेली. केवळ वाईट हवामानामुळेच उड्डाणे रद्द होत नाहीत. उड्डाणांच्या रद्द होण्यामागे विमान कंपन्यांच्या व्यापारी धोरणातील बदलही कारणीभूत आहेत. कमी नफ्याच्या उड्डाणांची संख्या घटली आहे. विमानतळावर विमाने अडवून ठेवणार्‍यांकडून सरकार मोठा दंड वसूल करत आहे. त्यामुळे विमान कंपन्या विलंब करण्याऐवजी उड्डाण रद्द करण्यावर भर देत आहेत.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे निर्णय कोणत्या पातळीवरून घेतले जात आहेत? सध्या हे निर्णय एका प्रणालीअंतर्गत घेण्यात येत आहेत. अमेरिकन एअरलाइन्सने आपल्या प्रणालीला ‘कॅन्सिलेटर’ असे म्हटले आहे. प्रवासी विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो.
12 फेब्रुवारी रोजी दुपारी डल्लासच्या फोर्टवर्थ विमानतळाबाहेरील अमेरिकन एअरलाइन्सचे ऑपरेशन कंट्रोल सेंटर पाहून हा अंदाज लावणे कठीण होते की, अटलांटिक किनारा बर्फाळ वादळांच्या टप्प्यात येईल. 36,340 फूट उंचीवर स्काय बॉक्सप्रमाणे दिसणारा आपत्कालीन कक्ष रिकामा होता. एका केबिनमध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे ट्रॅफिक डिस्पॅचर रॉन शुल्ड आणि बिली सेझेंडरी एका संगणकावर विमानांची ये-जा, विमानतळांची स्थिती, मार्गक्रमण इत्यादींवर नजर ठेवून होते.
दुसर्‍या एका स्क्रीनवर इतर सर्व विमानांची स्थिती दिसत होती. त्यावर हवामानाचे रडार होते. खराब हवामानात अमेरिकन सेवा कशा प्रकारे काम करत आहेत, हे तिसर्‍या स्क्रीनवर दिसत होते. तेथे विमानांची ये-जा, उड्डाणांच्या विलंबाविषयी सूचना झळकत होत्या. वैमानिक दलातील सदस्य नियोजित वेळेपेक्षा अधिक तास काम करत असल्याची माहिती मिळत होती. शुल्झ आणि सेझेंडरी हे सर्व सूचना, आगमन-निर्गमनाचे तपशील कॅन्सिलेटरमध्ये टाकत होते. एक उड्डाण रद्द झाल्यामुळे किती प्रवासी प्रभावित होतील? किती प्रवासी पर्यायी उड्डाण निवडतील? पायलट किंवा क्रू मेंबरपैकी कोणी सर्वाधिक वेळ काम केले आहे? या माहितीच्या आधारे कॅन्सिलेटर उड्डाणे रद्द करण्याची यादी देत होता.
कोणतेही उड्डाण रद्द करण्यापूर्वी तीन महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर भर दिला जातो. त्यात प्रवासी, क्रू मेंबर आणि विमानांची उपलब्धता हे होत. पायलट एका महिन्यात 100 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत. फ्लाइट अटेंडंटसाठीदेखील वेळेची र्मयादा आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांपेक्षा देशांतर्गत उड्डाणांवर प्राधान्य दिले जाते. कनेक्टिंग फ्लाइट नसेल, तरीही उड्डाणे रद्द होण्याची शक्यता अधिक आहे. जास्त दराच्या उड्डाणांना कमी दराच्या उड्डाणांच्या तुलनेत प्राधान्य दिले जाते.
अनेकदा अनैसर्गिक समस्यांना तोंड द्यावे लागते. उपराष्ट्रपती जो बायडेन यांचे विमान एअरफोर्स 2 मियामीवरून उड्डाण घेत होते. सुरक्षेच्या दृष्टीने हवाई मार्ग मोकळा ठेवण्याची गरज होती. बायडेन यांचे विमान अर्धा तास उशिरा होते. त्यामुळे पुढची आणखी विमाने अडकली. अशा परिस्थितीवर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही.

विलंबासाठी भुर्दंड
अमेरिकेतील देशांतर्गत उड्डाणे प्रवाशांसहित विमानतळावर 3 तासांपेक्षा अधिक काळ ताटकळली, तर दर प्रवाशामागे 17 लाख रुपये दंड आकारणी.
- सॅम फ्रिजेलसह