आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अमेरिकेचे एयरफोर्स वन म्हणजे जणू उडणारे White House

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - एयरफोर्स वन विमानात स्टाफ बरोबर बराक ओबामा.
जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे प्रमुख या आठवड्याच्या अखेरीस भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा 26 जानेवारीला होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असणार आहेत. या दौर्‍यासाठी ओबामा त्यांच्या खास विमानाने म्हणजे 'एअरफोर्स वन' द्वारे भारतात येतील. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात 'एअरफोर्स वन' ची वैशिष्ट्ये...

उडणारे व्हाइट हाऊस
'एअरफोर्स वन'ला उडणारे व्हाइट हाउस म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ओबामा प्रवास करत असतानाही या विमानातून सगळे कामकाज चालवत असतात. विमानाच्या मागच्या भागामध्ये जगभरातील राडार जाम करणारे जॅमर आणि प्रमुख अधिकार्‍यांचे कार्यालय आहे. अमेरिकेच्या सुरक्षा संस्थांनी राष्ट्रपतींसाठी दोन विशेष विमाने तयार केली आहेत. त्यांना एअरफोर्स वन असे नाव आहे. एअरफोर्स वन हे मोठे बोइंग 747-200 बी जेट आहे. राष्ट्रपतींच्या गरजांचा विचार करून ते तयार करण्यात आले आहे. बोईंगप्रमाणेच हे तीन मजली विमान आहे.
45 हजार फुटावरुन कुठेही कॉल
राष्ट्रपती आणि त्यांचा सर्व स्टाफ जगातील कोणत्याही कोपर्‍यात 45,000 फूट उंचीवरून कोणाशीही बोलू शकतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये 238 मैलाचे वायरिंग आहे. विमानात 87 ऑन बोर्ड टेलिफोन, टू-वे रेडिओ, फॅक्स मशीन आणि संगणकाचे कनेक्शन आहेत. विमानात 19 टिव्हीदेखिल आहेत.

शस्त्रास्त्राने सज्ज
एअरफोर्स वन मध्ये अनेक घातक लेजर आणि शस्त्रास्त्रे आहेत. म्हणजेच उड्डाणादरम्यान धोका बनलेल्या विमानांचा एअरफोर्स वनद्वारे क्षणात नायनाट करता येऊ शकतो. हल्ला झाला आणि धोका वाढलाच तर विमानात लावलेल्या एस्केप पॉड (विशिष्ट प्रकारचे कॅप्सूल) द्वारे त्यांना सुरक्षित बाहेर काढले जाऊ शकते. यूएस एअरफोर्सचे बी-2 बॉम्बर एअरक्राफ्ट्स आणि इतर लढाऊ विमाने या विमानाला मिड एअर रि-फ्यूलिंगची सुविधा देतात.
डायनिंग रूम
किचनमध्ये सुमारे 100 लोकांसाठी 20 वेळा जेवण सर्व्ह करता येते. म्हणजे ओबामा उड्डाणादरम्यानही 2,000 जणांना जेवणाचे निमंत्रण देऊ शकतात. याच भागात राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाचे बेडरूमही आहे.

दृष्टीक्षेपात बोइंग 747-200 बी
क्रू- 26 (दोन पायलट सह)
क्षमता - 78 प्रवासी
लांबी - 70.6 मीटर
विंग स्पॅन- 59.8 मीटर
ऊंची - 19.3 मीटर
जागा - 4000 चौरस फूट
क्रूज स्पीड - 925 किमी/ताशी
एअरक्राफ्ट बॉडी - अणू हल्ला रोधक
एका तासाच्या उड्डाणाचा खर्च - 42 लाखांहून अधिक (68 हजार डॉलर)
विमानासाठी आलेला खर्च - 20 अब्जाहून अधिक
पुढे पाहा, एअरफोर्स वनचे PHOTO