अनेक लोकांना वाटतं की, भावना, प्रेम ह्या केवळ मानवालाच आहेत. मानवच रडू शकतो, हसू शकतो आणि भावना व्यक्त करू शकतो. मात्र ही समजूत फार चुकीची आहे असे वाटते. अनेक प्राणी आपल्या मित्र/मैत्रिणीच्या, कुटुंबियाच्या जाण्याने टाहो फोडतात, दुःखी होतात. त्यांनाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने अपार दुःख होते हे अनेक वेळा दिसून येते. हा चिमूरडा पक्षी आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी, जागवण्यासाठी जीवाचा आकांड तांडव करतानाचे ही छायाचित्रे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पक्ष्यांची ही दुर्मिळ आणि जीवापाड प्रेम दर्शवणारी छायाचित्रे Divyamarathi.com घेऊन आलाय खास तुमच्यासाठी...
- ही छायाचित्रे पाहिल्यानंतर तुमच्याही भावना नक्कीच भरून येतील. त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती आहे की, जर कधी तुम्हाला एखादा पक्षी रस्त्यावर मरून पडल्याचे आढळल्यास कृपया त्याला रस्त्याच्याकडेला उचलून ठेवा. जेणे करून त्याच्या शरीरावरून इतर गाड्या जाऊ नयेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या पक्ष्याचा आपल्या मैत्रिणीच्या वियोगाने आक्रोश करणार्या या चिमुरड्या पक्षाची छायाचित्रे...