कॅलिफोर्निया -
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग सातत्याने एकसारखेच राखाडी रंगाचे टीशर्ट वापरताना का दिसतो? त्याच्याकडे एकच टीशर्ट आहे रोज तोच शर्ट घालतात काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल; परंतु झुकरेबर्गने स्वत:च याचा खुलासा केला आहे. झुकरेबर्गला जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने प्रथमच फेसबुक मुख्यालयाबाहेरील लोकांसाठी एक प्रश्नोत्तराचे सत्र भरवले. यात त्याने
आपल्या ग्रे टीशर्टचे रहस्य उलगडले.
झुकरेबर्ग म्हणाला, "माझ्याकडे एकसारखे असे अनेक टीशर्ट आहेत; परंतु मी माझी ऊर्जा काय घालावे आणि काय नको यासारख्या फालतू गोष्टी ठरवण्यात घालवत नाही. मी जगातील सर्वात मोठे नेटवर्क सांभाळण्यात व्यग्र असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी आपले आयुष्य अतिशय पारदर्शक ठेवू इच्छितो. जेणेकरून आपल्या ऊर्जेचा प्रत्येक कण सर्वोत्तम उत्पादन आणि सेवेसाठी उपयोगात आणू इच्छितो.
झुकेरबर्ग यांनी एका तासाच्या सत्रात प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देताना भविष्यातील योजनाही सांगितल्या.