आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच धूमकेतूवर उतरले अंतराळयान, पृथ्वीपासून 48 कोटी किमी अंतरावर लँडींग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: युरोपियन स्पेस एजंसीच्या रोसेटा मिशन तर्फे सोडण्यात आलेले रोबॉटिक अंतराळ यान लँडर मॉड्यूल 'फिलाय'ला धूमकेतूवर उतरण्यास यश मिळाले आहे. अशा प्रकराची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. त्यामुळे युरोपीयन स्पेस एजंसीच्या रोसेटा मिशनचे हे मोठे यश मानले जात आहे. युरोपियन स्पेस एजेंसीने रोसेटाची निर्मिती धुमकेतु (67P/Churyumov–Gerasimenko) चा अभ्यास करण्यासाठी केली होती.
इस्टर्न स्टँडर्ड टाइमनुसार बुधवारी सकाळी साडे 10 वाजेच्या जवळपास 'फिलाय' धुमकेतूवर यशस्वीरित्या उतरले. हे लँडींग पृथ्वीपासून जवळपास 30 कोटी मैल म्हणजेच 48 कोटी किलोमिटर एवढ्या दूर झाले. रोसेटा मिशनला पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 10 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा एवढा विशाल खर्च करुनही या यशाच्या मानाने हा खुप कमी असल्याचे तज्ज्ञ मानतात. काही महिन्यांपूर्वी भारताने पाठवलेले यानही मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले होते.
छायाचित्रे मिळण्यास झाली सुरूवात
धुमकेतूवर उतरल्यानंतर 'फिलाय'ने फोटो पाठवण्यास सुरूवात केली आहे. लँडींगनंतर बराच वेळ रोसेटा मिशनच्या तज्ज्ञांमध्ये अस्वस्थता होती. याचे कारण म्हणजे लँडींगनंतर या यानाशी संपर्क साधण्यात शास्त्रज्ज्ञांना 28 मिनटांचा वेळ लागला. मात्र लँडींगची जशी माहिती मिळाली, त्याक्षणी शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.
या मिशनची का आहे आवश्यकता ?
धूमकेतूची हे आपली सोलार यंत्रणा ज्या पदार्थाने बनली आहे त्याच पदार्थाने बनलेले असतात. यामुळे त्याचा अभ्यास करून पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवता येऊ शकते. धुमकेतूवर असलेल्या जवळपास 4 अब्ज वर्षांपूर्वीच्या भौतीक माहितीवरून काही महत्त्वाचे तत्थ सापडू शकतात. रोसेटा स्पेसक्राफ्ट पुढील वर्षापर्यंत या धुमकेतूवर असणार आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, धूमकेतूवरून फिलायने पाठवलेले फोटो...