आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनलाही मागे टाकणारा, सर्वात जास्त स्पिड असणारा ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सर्वाधिक वेगवान असणा-या शॉकवेव या ट्रकची स्पिड एवढी जास्त आहे, की तो ट्रक बुलेट ट्रेनलाही मागे सोडते. चार टन वजन असणा-या या ट्रकमध्ये चार इंजिन लावण्यात आले आहेत. 400 किलोमिटर प्रती तास या प्रचंड वेगाने हा ट्रक धावतो. हे आकर्षक व्हेइकल 1984 मध्ये लेस शॉकल याने प्रथम तयार केले होते.

64 वर्षाच्या नील डार्लेनने त्याच्या 31 वर्षीय मुलासोबत मिळून हे व्हेइकल विकसित केले आहे. हा ट्रक जगातील सर्वाधिक गतीमान फुल साइज ट्रक आहे. या ट्रकने वर्ल्ड रोकॉर्ड केला आहे. हा एक अद्वतीय आनंद असल्याचे नील सांगतो. तुम्ही हे वाहन पाहिल्यानंतर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

शॉकवेवमध्ये प्रॅट आणि व्हिटनी 34-38 इंजन लावलेले आहेत. दोन्ही इंजिन नेव्ही ट्रेनर जेटमधून काढण्यात आले आहेत. प्रत्येक इंजिन 12 हजार हॉर्स पॉवरचे आहे. हे दोघे पिता, पुत्र यूएस आणि कॅनडामधील लोकांना याचे परफॉर्मन्स दाखवत असतात. या ट्रकचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

या ट्रकचे काही फोटो पाहा पुढील स्लाइडवर..