आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Are Similarity Ajanta And Chiese Caves, Divya Marathi

अजिंठा व चीनमधील लेणींत साम्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - भारतातील पाचव्या शतकातील अभिजात शिल्प व चित्रकला आणि चीनच्या दुहुआंग लेणींमध्ये लक्षणीय साम्य असल्याचे आढळून आले आहे. दोन भारतीय पुरातत्त्वज्ञांनी आग्नेय आशियातील शिल्पांवर पाच वर्षे संशोधन केले. त्यात अजिंठा लेणी व चीनमधील लेणींत प्रचंडसाम्य आढळले. या शिल्पांवर बौद्ध काळ व रामायण महाकाव्याचा प्रभाव दिसून आला.
विशेष म्हणजे कुमुदा क्रोविधी हे मूळचे हैदराबाद येथील संशोधक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मात्र, त्यांनी पूर्णवेळ या शिल्पसंशोधनाला व पेंटिंग्जना वाहून घेतले आहे. ते सध्या सिंगापूर येथे स्थायिक आहेत. दरम्यान, संशोधकांनी गौतम बुध्द यांच्या संकल्पनेवर आधारित १८ क्लासिकल चित्रकृती , १४ पेंटिंग्ज रामायण मधुबनी पद्धतीने तयार केल्या आहेत. या संशोधनाधारित पेंटिंग्ज तयार करण्यास त्यांना ५ वर्षे लागली, अशी माहिती क्रोविधी यांनी दिली.