Home | International | Other Country | third arrest in 'unprovoked killing' of indian student in uk

इंग्लंडमध्ये पुण्यातील विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या, चौघांना अटक

वृत्तसंस्था | Update - Dec 28, 2011, 11:55 AM IST

पुण्यातील एका विद्यार्थ्याची इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

 • third arrest in 'unprovoked killing' of indian student in uk

  लंडन- पुण्यातील एका विद्यार्थ्याची इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अनुज बिडवे (वय 23) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुजच्या मित्रांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या हत्येमागे वांशिक किंवा वर्णविद्वेषाचे कारण आहे काय, याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी मॅंचेस्टर पोलिसांनी आतापर्यंत सतरा वर्षांच्या एका मुलासह चौघांना ताब्यात घेतले आहे. अनुज हा पुण्यातील सिंहगड संस्थेचा विद्यार्थी होता. तीन महिन्यापूर्वी तो ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यास गेला होता. सध्या तो मॅंचेस्टर भागातील सॉल्फर्ड शहरात राहत होता. अभियांत्रिकीत पदवी घेतल्यानंतर येथील लॅंकेस्टर विद्यापीठात मायक्रो इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता.
  रविवारी रात्री ख्रिसमस साजरा करण्यासाठी अनुज व तेथेच शिक्षण घेणारी काही भारतीय विद्यार्थी मॅंचेस्टरला गेले होतो. ख्रिसमस साजरा करीत असताना काही तरुण त्यांच्याजवळ आले. तसेच त्याने अनुजला किती वाजल्या आहेत, असेव विचारले. मात्र, त्यानंतर काही कळायच्या आतच संबंधित तरुणाने आपल्या खिशातून पिस्तूल काढत अनुजच्या डोक्‍यात गोळी झाडली. त्यात अनुज जागेवरच मृत झाला. रात्री एकची वेळ असल्याने व गोळी झाडणारा आणि त्याचा साथीदार आंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
  अनुजच्या मित्रांनी सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे मॅंचेस्टरच्या ऑर्डसाल लेन-सालफोर्ड या भागात पोलिसांनी तपास करीत आहेत. त्यात मंगळवारी एका सतरा वर्षांच्या मुलासह चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बुधवारी आणखी एका युवकाला मॅंचेस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे याबाबतची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  अनुजचे वडील सुभाष बिडवे व्यावसायिक असून, आई गृहिणी आहे. ते दोघेही पुण्यात राहतात. अनुज हा त्यांचा एकटा मुलगा होता. अनुजला नेहा नावाची विवाहित बहीण आहे. दरम्यान, ख्रिसमसची सुटी असल्याने भारतात त्याचा मृतदेह पाठविण्यास विलंब होणार आहे. तरीही लॅंकेस्टर विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अनुजचा मृतदेह भारतात लवकरात लवकर पाठवावा, यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.
  फेसबुकवरही श्रद्धांजली
  अनुजची हत्या झाल्याची बातमी कळताच फेसबुकवरुन त्याला श्रद्धांजली वाहणारे अनेक स्क्रॅप दिवसभर टाकण्यात आले. अनुज मित्रांनी तसेच नेटिझन्सनी या हत्येचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला. अनुजच्या हत्येच्या निषेधार्थ सॅलफोर्ड येथे २ जानेवारीला सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी दिल्लीत इंडिया गेट ते जंतरमंतर यादरम्यान मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.Trending