आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळाच्या 90 टक्के पृष्ठभागाचा थ्री-डी नकाशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या मार्स एक्स्प्रेसवर बसवण्यात आलेल्या हाय रेझ्युलेशन स्टिरिओ कॅमे-या च्या साह्याने मंगळाच्या 90 टक्के पृष्ठभागाचा थ्री डी नकाशा तयार करण्यात आला असून त्यामुळे लाल ग्रहाच्या विविध भौगोलिक बाबींवर प्रकाश पडणार आहे. मार्स एक्स्प्रेसने मंगळाच्या 87.8 टक्के पृष्ठभागाचा थ्री-डी नकाशा कोणत्याही रेझ्युलेशनला, तर 61.5 टक्के पृष्ठ भागाचा नकाशा 20 पेक्षा जास्त मेगापिक्सल प्रतिमिनिट रेझ्युलेशनला टिपला आहे.

20 जून 2012 रोजी मंगळाची प्रदक्षिणा पूर्ण केली. या प्रदक्षिणेत एकूण 2702 छायाचित्रे टिपण्यात आली. हा नकाशा भूमध्यरेषेशी संलग्न आहे. याचाच अर्थ मंगळाचा प्रदेश या नकाशात संगतवार दिसणार नाही. कॅमेराने एकाचवेळी लाल, हिरव्या, निळ्या आणि अंधूक टोनमध्ये मंगळाच्या पृष्ठभागाचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचे हे सर्वात जवळचे निरीक्षण आहे. तेथील अनेक भौगोलिक बाबींवर त्यात प्रकाश पडला आहे.