आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याच्या अखेरीस पोप बेनेडिक्ट राजीनामा देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅटकीन सिटी - कॅथालिक ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू व्हॅटिकनच्या पोपने या महिन्याच्या अखेरीस आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आता ते 85 वर्षांचे वृद्ध झाले आहेत, असे व्हॅटिकनने म्हटले आहे.
85 वर्षीय पोप बेनेडिक्ट 16 वे हे एप्रिल 2005 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या निधनानंतर पोप बनले होते.

वयाच्या 78 व्या वर्षी पोप बनलेले कार्डिनल जोसेफ व्हॅटिकनचे पोप बनणारे सर्वात वयोवृद्ध पोपपैकी एक होते. पोप बेनेडिक्ट यांच्या कार्यकाळात कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच चर्चच्या पादरींवर बाल लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत. कोणतीही चर्चा न होताच अचानकच पोपच्या राजीनाम्याचे वृत्त आले आहे. पोप राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा त्यांच्या निकटच्या सहका-यांनाही लागला नाही, असे व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

शरीर थकले आहे...
आज झपाट्याने जग बदलत चालले आहे.ईश्वरावरील श्रद्धाही डळमळीत होत चालली आहे. अशा स्थितीत सेंट पीटरचा आदेश आणि ख्रिश्चन धर्माच्या सिद्धांतानुसार मेंदू आणि शरीराच्या शक्तीने साथ देणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्या शरीरातील शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे जबाबादारी पार पाडण्यास मी समर्थ नाही, याची मला जाणीव होऊ लागली आहे, असे पोप यांनी म्हटले.