आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगचे असे उल्लंघन पाहिले नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इस्रायलमध्ये पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याचा एक अजब प्रकार घडला. तेल अवीव येथे राहणा-या हिला बेन बरूच यांनी त्यांची कार घराबाहेर पार्क केली होती, पण थोड्याच वेळात कार गायब झाल्याचे पाहून त्या चकित झाल्या. कारच्या जागेवर पांढ-या रंगाने रेषा ओढून अपंगांसाठी वाहनतळ लिहिण्यात आले होते. हिला यांनी म्युनिसिपल कॉल सेंटरवर तक्रार नोंदवली असता तेथील कर्मचा-यांनी तिलाच दोषी ठरवले. कार परत हवी असेल तर पार्किंग नियम मोडल्याप्रकरणी 5 हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले.

हिला यांनी हार मानली नाही. शेजारच्या एका कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कारचे फुटेज मिळू शकते हे लक्षात येताच हिला यांनी ते मिळवले. त्यामध्ये हिला यांची कार योग्य जागी उभी असून महापालिकेचे कर्मचारी येतात व कारभोवती अपंगांच्या वाहनतळाची पांढरी रेषा ओढतात. त्यानंतर एक ट्रक येऊन हिला यांची कार घेऊन जातो, हे स्पष्ट दिसते. फेसबुकवर फोटोसह टाकलेली हिला यांची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
israelhayom.com