आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ गेमचा संग्राहक थॉम्सन गिनीज बुकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बफेलो -जगातील सर्वाधिक व्हिडिओ गेमचा संग्रह असलेली व्यक्ती अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद होण्याचा मान न्यूयॉर्कमधील 31 वर्षीय मायकल थॉम्सनला मिळाला. त्याच्याकडे सुमारे 11,000 व्हिडिओ गेमच्या संग्रह आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स 2014 च्या गेमर्स आवृत्तीमध्ये त्याच्यावर दोन पृष्ठे माहितीही देण्यात आली आहे.
मायकल 12 वर्षांचा असताना त्याने नाताळनिमित्त पहिला गेम खरेदी केला तो कॉस्मिक अव्हेंजर. परंतु तो गेम कन्सोलवर खेळण्यासाठी वर्षभर प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यातूनच कोणत्याही सिस्टिमवर प्रत्येक व्हिडिओ गेम खेळण्याचे कौशल्य त्याने प्राप्त केले. माझ्याकडे कार्ट्रेज, लेजर डिस्कवर गेम आहेत. माझ्याकडे व्हीएचएस, कॅसेटवर आधारितही गेम आहेत, असे तो म्हणाला.