आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चावेझ यांना लाखो लोकांचा अखेरचा लाल सलाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅराकस - गोरगरिबांचे मसिहा व्हेनेझ्युएलाचे नेते ह्युगो चावेझ यांना लाखो देशवासीयांनी साश्रुनयनांनी बुधवारी अखेरचा लाल सलाम केला. शहराच्या दक्षिणेकडील कार्लोस अर्वेलो रुग्णालयातून त्यांचे पार्थिव नैऋत्येकडील लष्करी अकादमीत आणण्यात आले.सुमारे 8 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी सुमारे 7 तास लागले.

आज दफनविधी : चावेझ यांचे पार्थिव लष्करी अकादमीत तीन दिवस ठेवण्यात येणार आहे.सरकारी इतमामात दफनविधीस शुक्रवारी सुरुवात होईल.त्यांना कुठे दफन करणार आहेत हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. बुधवारी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी दक्षिण अमेरिक ाखंडातील अर्जेंटिना,बोलिव्हिया,उरुग्वेचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. चावेझ यांच्या सोशलिस्ट पक्षाच्या लाल रंगाचे टीशर्ट घालून निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.राष्ट्रध्वजात गुंडाळेल्या चावेझ यांच्या शवपेटीला हात लावण्याठी लोकांची धडपड सुरू होती.

मला आणखी जगायचे आहे... : चावेझ यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षा प्रमुख जोस ऑर्नेला यांनी सांगितले. त्यांना बोलता येत नव्हते परंतु अखेरच्या क्षणी त्यांच्या ओठांची हालचाल पाहता ‘मला मरायचे नाही. मला आणखी जगायचे आहे. मला मरू देऊ नका ’असे ते म्हणत होते असे त्यांनी सांगितले.