बगदाद -
इराकमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या आयएसआयएसच्या हिंसेपासून वाचण्यासाठी 40 हजार यजीदी नागरिकांनी सिंजरमधील पर्वतांमध्ये आश्रय घेतला आहे. यजीदी समाज हा
इराकमध्ये अल्पसंख्याक आहे.
या समाजाची मोठी लोकसंख्या सिंजरमध्ये होती. पण दहशतवादी हल्ल्यांमुळे 2 लाख लोकांनी घरे सोडली आहेत. जवळ-जवळ 1 लाख 47 हजार लोकांनी कुर्द भागात असलेल्या निर्वासित कँपमध्ये आश्रय घेतला आहे, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले. 40 हजार लोक सिंजरमधील पर्वतांमध्ये आश्रय घेतला आहे.
भूक आणि पाण्या अभावी 40 मुलांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती खूप वाईट असून लोकांसमोर पाणी आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे युनिसेफचे प्रवक्ते जुलियट टोमा यांनी सांगितले. यजीदी समुदाय हा प्राचीन पर्शियन धर्म झोरास्टियनवर विश्वास ठेवायचा. पण नंतर त्यांनी आपला धर्म बदलला. दहशतवाद्यांकडून करण्यात येणा-या कारवाया या मानव जातीला लाजवणा-या आहेत. पुरूषांना भर रस्त्यावर मारले जात आहे, तर महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत आहेत, असे यजीदी संघटनेचे प्रमुख होसम सलीम यांनी सांगितले.
मागील दिवसांपासून यजीदींवरील हल्ले आयएसआयएसने वाढवले आहेत. इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचा विस्तार करण्यासाठी दहशतवाद्यांनी अनेक मोठ्या शहरांवर ताबा मिळवला आहे.
आयएसआयएसच्या भीतीने सिंजर पर्वतांमध्ये लपलेल्या यजीदींचे छायाचित्रे......
( स्त्रोत- Twitter )