Home | International | Pakistan | threat-from-india-is-real

भारतीय सीमेवरील तैनात सैन्याला पाकिस्तान म्हणते युद्ध तयारी

वृत्तसंस्था | Update - Jul 13, 2011, 05:44 PM IST

स्लामाबादेतील द नेशन या वृत्तपत्राने भारताच्या सीमेवरील तैनात सुरक्षा रक्षकांना युद्धाची तयारी म्हटले आहे.

  • threat-from-india-is-real

    इस्लामाबाद - पाकिस्तानातील अतिरेकी संघटना या भारतासह जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेनेही मान्य केलेले असतांना पाकिस्तानी मीडिया मात्र या उलट बातम्या देत आहे. इस्लामाबादेतील द नेशन या वृत्तपत्राने भारताच्या सीमेवरील तैनात सुरक्षा रक्षकांना युद्धाची तयारी म्हटले आहे.
    भारतीय सैनिक हे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी कायम धोकादायक असल्याचा दावा दैनिकाने केला आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी मात्र या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दैनिकाच्या 'ओपिनियन' कॉलममध्ये छापण्यात आलेले वृत्त हे केवळ प्रोपागंडा असु शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानी मीडियाने या आधीही भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे. विकीलिक्सचा एक खोटा खुलासाही भारतविरोधी वातावरण निर्मीतीसाठी करण्यात आला होता.
    'द नेशन' नुसार काश्मिरमध्ये भारताने मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. तसेच पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाब आणि हरियाना राज्यातही अनेक ब्रिगेड तैनात करण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्येही २ इन्फ्रंट्री डिव्हिजन, १ आर्मार ब्रिगेड आणि १ मॅकेनाइज्ड ब्रिगेड तैनात केल्याचा दावा करण्यात आला आहे.
    दैनिकात सीमेवरील तैनात सैन्याला पाकिस्तान विरुद्धची युद्ध तयारी असल्याचे वारंवार म्हटले आहे. 'द नेशन'ने म्हटले आहे की, भारताची ७० टक्के सेना ही पाकिस्तानविरुद्ध तैनात आहे. खरेतर चीन आणि बांग्लादेश सीमेवर सर्वाधीक भारतीय सेना सुरक्षेसाठी तैनात आहे. तसेच 'द नेशन'ने मागील वर्षी भारतीय सैन्याने केलेल्या युध्दाभ्यासाचीही यादी दिली आहे. त्यासाठी नुकत्याच राजस्थानमधील बिकानेर-सुरतगढ येथे झालेल्या सैन्याभ्यासाचा दाखला देण्यात आला आहे.Trending