फोटो: इस्लामिक स्टेटच्या दहशदवाद्यांनी सीरियातील रक्का शहरात तीन लोकांचे शिर कापले
दमिश्क - आयएसआयएसच्या दहशदवाद्यांनी सीरियातील रक्का शहरात खुलेआम 3 नागरिकांचे शिर कापल्याचा प्रकार घडला आहे. 'अल्लाहचा अपमान' आणि जादू-टोणा केल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. या सर्व घटनेची छायाचित्रे संघटनेकडून प्रकाशित करण्यात आली आहेत. तर इस्लामिक स्टेट या संघटनेने दहशतवादी कृत्याचे ट्रेनिंग देण्य़साठी सीरियामध्ये नवीन शाळा उघडली असून त्याचे नाव - ओसामा बिन लादेन स्कूल असे ठेवण्यात आले आहे.
खुलेआम दिली शिक्षा
आयएसआयएसने प्रकाशित केलेल्या छायाचित्रांमध्ये दहशदवादी रस्त्यावर लोकांचे शिर कापताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला अनेक लोक उभे आहेत ज्यामध्ये लहान मुलांचादेखील सामावेश आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या एका छायाचित्रामध्ये चेहरा झाकलेला एक दहशदवादी लाउडस्पीकरच्या मदतीने या तीन व्यक्तींनी केलेले गुन्हे वाचून दाखवत आहे.
लादेनच्या नावाने सुरु केली शाळा
आयएसआयएसने दहशदवादी ट्रेनिंग देण्यासाठी ओसामा बिन लादेनच्या नावाने एका शाळेची सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही शाळा उत्तरी सीरियामधील मनबिज या छोट्या शहरात सुरु करण्यात आली आहे. या शाळेमध्ये इस्लामिक स्टेटचे धर्मगुरू येथील नागरिकांना शरिया कायद्याबद्दल माहिती देत आहेत.
संघटनेच्या प्रांतीय मीडिया शाखेने या संबंधित एक प्रोपेगेंडा व्हिडियोदेखील प्रकशित केला आहे. 5 मिनिटांच्या या व्हिडियोचे टायटल 'अध्यापकांसाठी शरिया शैक्षिक सत्र' असे आहे. यामध्ये मनबिज येथील काही नागरिक नव्याने सुरु करण्यात आलेल्या शाळेबद्दलच्या फायद्यांबद्दल बोलताना दाखवण्यात आले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयएसआयएसच्या आधी मनबिजवर फ्री सीरियन आर्मीचे नियंत्रण होते. जानेवारी 2014 मध्ये बशर सेनेने आयसएआयएस दहशदवाद्यांना येथून हकलून लावले होते. परंतु, 18 दिवसांनंतर येथे पुन्हा दहशदवाद्यांनी ताबा मिळवला होता.
पुढील स्लाइडवर पाहा रक्का शहरात खुलेआम देण्यात आलेली 'सजा-ए-मौत' ची छायाचित्रे...