आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Reality Show Crew Members Killed In Helicopter Crash

अमेरिकेत रिअँलिटी शोमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - उत्तर लॉस एंजिल्समध्ये सोमवारी पहाटे एक हेलिकॉप्टर टीव्ही रिअँलिटी शोच्या सेटवर कोसळून झालेल्या अपघातात 3 ठार झाले. डिस्कव्हरी वाहिनीसाठी अँक्टन शहराजवळील पोल्सा रोझा रांच भागात एका कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू असताना हेलिकॉप्टर कोसळले.मृतांमध्ये हेलिकॉप्टरमधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम लष्करी कारवायांवर आधारित असून वाहिनीने आणखीन या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. अमेरिकेतील आयवर्क ही प्रसिद्ध निर्माता कंपनी या कार्यक्रमाची निर्मिती करत आहे. दरम्यान, डेलावेअरमधील विल्मिंग्टन न्यायालयात सोमवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन ठार झाले. मृतांत दोन महिला व हल्लेखोराचा समावेश आहे.