आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three scenarios lie ahead for hosni mubarak on judgment day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना जन्मठेप, कैरोत आनंदोत्सव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो- इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना शांततेने आंदोलन करणा-या शेकडो लोकांना ठार मारल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कैरोमधील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा जाहीर होताच राजधानी कैरोसह संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष मुबारक, माजी मंत्री हबीब आणि सहा सहका-यावर शांततेने आंदोलन करणा-या निरपराध नागरिकांना ठार मारल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप ठेवलेल्यांमध्ये उद्योगपती हुसेन सालेम यांचाही समावेश आहे.
इजिप्त क्रांतीच्या काळात सत्ताधारी मुबारक सरकारने १८ दिवसात शेकडो नागरिकांना मारले होते. मुबारक व त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. जन्मठेपेची शिक्षा झाल्याने इजिप्तमध्ये धुव्रीकरण होण्याची शक्यता आहे. मुबारक यांना दोषी धरले किंवा मुक्त केले तरी इजिप्तसाठी हे घातक ठरु शकते. जानेवारीत इजिप्तमधील क्रांतीच्या काळात हत्याकांड, सरकारी निधीचा गैरवापर असे अनेक आरोप मुबारक यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर ठेवले आहेत.
हुकूमशहा स्ट्रेचरवर : काळेभोर केस, चेहर्‍यावर तुकतुकीतपणा आणि वय ऐंशी असे एका ओळीत मुबारक यांचे वर्णन करता येईल. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना डॉक्टरांनी शारीरिक हालचाली करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सत्तेचाळीस वर्षे सत्ता गाजवणारा हा हुकूमशहा स्ट्रेचर पडूनच सुनावणीला हजर राहिले. मुबारक यांनी आतापर्यंत आपल्यावरील कोणत्याही आरोपाची कबुली दिलेली नाही, हे विशेष.
मुबारक यांच्यावर कारवाईला सुरुवात