मोगादिशू - सोमालियामध्ये तीन दहशतवाद्यांना रविवारी (ता. 3) सार्वजनिक ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या झाडून यमसदनी पाठवण्यात आले. ते तिघे इस्लामिक दहशतवादी संघटना अल शबाबचे सदस्य होते. त्यांना येथील लष्करी न्यायालयाने निर्दोष लोकांची हत्या करण्याच्या कारवाईंमध्ये दोषी ठरवले होते व तिघांना बंदुकीच्या गोळ्या झाडून मारण्याचा आदेश दिला होता.
दहशतवाद्यांना राजधानी मोगादिशू येथील खांबांना बांधले आणि त्यांचा चेहरा झाकण्यात आला. नंतर त्यांना बंदुकीच्या गोळ्याचे फायरिंग करण्यात आले. तिन्ही दहशतवाद्यांनी राष्ट्रपती भवनावर हल्ले केले होते. तसेच अनेक निष्पाप नागरिकांना मारले होते.
पुढे पाहा दहशतवाद्यांना कसे बांधण्यात आले खांबांना .....