आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Years Old Girls Intelligence Rate Higher Than Stiffan Hockings

तीन वर्षीय मुलीचा बुद्ध्यांक स्टीफन हॉकिंगपेक्षा जास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील तीनवर्षीय मुलगी मेन्सा या उच्च बुद्ध्यांक (आयक्यू) असलेल्यांच्या संस्थेची सर्वात लहान सदस्य बनली असून तिचा बुद्ध्यांक जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त नोंदवण्यात आला आहे.

जगातील सर्वाधिक बुद्ध्यांक असलेल्यांची संस्था म्हणून मेन्साचा लौकिक आहे. या संस्थेने घेतलेल्या चाचणीत ऐलिस अमोस या तीनवर्षीय चिमुरडीचा बुद्ध्यांक 162 असल्याचे निश्चित झाले आहे. हा बुद्ध्यांक जगातील काही प्रसिद्ध बुद्धिवंतांशी मिळता जुळता आहे. ब्रिटनमधील गिल्डफोर्डची रहिवासी असलेली ऐलिसा द्विभाषिक असून तिला इंग्रजी आणि रशियन या दोन भाषा येतात. जगात एवढा बुद्ध्यांक असलेल्यांची संख्या केवळ एक टक्का असून तिचा समावेश या ‘टॉप वन पर्सेंट्स’मध्ये झाला आहे. भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी त्यांचा बुद्ध्यांक अधिकृतरीत्या जाहीर केला नसला तरी तो 160 ते 165 च्या दरम्यान असल्याचे मानले जाते. प्राथमिक शाळेत शिकणारे मेन्साचे केवळ 18 सदस्य असून एवढा प्रचंड बुद्ध्यांक असलेली ऐलिसा ही एकमेव सदस्य आहे. तिला वाचन, लेखन, गायन, नृत्य, चित्रकला आणि हस्तकलेचा छंद असून तिने फावल्या वेळात इसापच्या दंतकथा आणि परिकथा वाचून काढल्या आहेत.
ऐलिसच्या पालकांनी ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ जोअन फ्रीमन यांचा अहवाल सादर केल्यानंतर तिला मेन्सामध्ये दाखल करण्यात आले. स्टॅनफर्ड बिनेट चाचणीत तिला 162 गुण मिळाले. या चाचणीत बौद्धिक क्षमता, तार्किकता, ज्ञान, गुणात्मकता, दृश्यस्थान प्रक्रिया आणि स्मरणशक्ती या पाच घटकांचे मापन केले जाते.

कोणाचा किती?
अब्राहम लिंकन128
बेंजामीन फ्रँकलीन162
बिल क्लिंटन137
नेपोलियन बोनापार्ट145
सिगमंड फ्राइड156