आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Obama Modi Discussion Two Nations Relation Become Strong, Divya Marathi

ओबामा-मोदींच्या चर्चेतून उभय देशांचे संबंध दृढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेतून जगातील दोन लोकशाही देश आणि त्यांच्या नेत्यांतील संबंध दृढ झाल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले. मोदी बुधवारी पाच दिवसांच्या दौ-यानंतर भारतात परतले. त्यांनी अमेरिकेचे आभार व्यक्त करत दौरा यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.
व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले, यामुळे अमेरिका आणि भारतातील बळकट संबंध दिसतात. तसेच दोन्ही नेते विविध विषयांवर चर्चा करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. ओबामा उपलब्ध संधीला महत्त्व देत असल्याचे अर्नेस्ट यांनी सांिगतले.