आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्फ्रारेड डिटेक्टरच्या साहाय्याने उंदराला मिळाला ‘सिक्थ सेन्स’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शास्त्रज्ञांनी दृष्टी न वापरताही प्रकाशाचा शोध घेता येणारे इन्फ्रारेड डिटेक्टर विकसित केले असून त्याच्या साहाय्याने उंदराला यशस्वीपणे ‘सिक्थ सेन्स’ देण्यात आला आहे.

शास्त्रज्ञ मिगुअल निकोलेलीस आणि त्यांच्या सहका-यांनी उंदराच्या मेंदूमध्ये इन्फ्रारेड डिटेक्टरचे प्रत्यारोपण केले. त्यामुळे उंदरालाला स्पर्श संवेदना प्राप्त झाली. जेव्हा प्रकाश दाखवण्यात आला तेव्हा उंदराला आपणास कुणीतरी स्पर्श केल्याचे जाणवू लागले. त्यांनी लगेचच त्या स्रोताचा शोध सुरू केला. दृष्टीचा वापर न करताही प्रकाशाचा वेध या डिटेक्टरमुळे घेतला जातो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. उंदराच्या कोणत्याही संवेदनांना धक्का न लावता पहिल्यांदाच त्यांना नवीन संवेदना प्राप्त करून देण्यात यश आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे संकेत प्रसारित करण्यासाठी त्वचेचा वापर करण्यात आला नाही. हे तंत्रज्ञान अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना खूपच उपयुक्त ठरेल,असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.