आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 फुटाच्‍या उंच लाटेमध्‍ये वाहून गेली अनेक लोक, पाहा घटनेची भयानक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - नदीच्‍या भयानक लाटा पाहून घाबरलेले चीनी नागरिक)
बीजिंग - चीनमधील जेझियांग प्रांतामध्‍ये आलेल्‍या चक्रीवादळामुळे कियानतांग नदीमध्‍ये सुमारे 30 फुट उंचीच्‍या लाटा निर्माण झाल्‍या. 148 फुट लांब भिंतीला नेस्‍तनाबुत करुन लाटा किना-यावर आदळल्‍या. त्‍यामध्‍ये कित्‍येक लोक वाहुन गेले तर मोठ्या प्रमाणार जखमी झाले.
दरवर्षी ये‍थे लोक उसळणा-या लाटा पाहायला येतात. गेल्‍या वर्षी ऑगस्‍ट महिन्‍यात अशाच प्रकारे लाटा पाहायला लोक आले होते आणि एका प्रचंड लाटेमुळे वाहत जावून शेकडो लोक जखमी झाले होते.

का उठतात लाटा
ही नदी हांगझोउच्‍या खाडीला मिळते. खाडीमधील उसळणा-या लाटांमुळे या नदीतही लाटा उसळतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, नदीच्‍या भयावह लाटांचे आणि जीव वाचविण्‍यासाठी पळणा-या लोकांची छायाचित्रे...