शिकागो - अमेरिकन डेअर डेव्हिल निक वॉलेंडा हे शिकागो नदीच्या किनाऱ्यावरील दोन इमारतींवर दोर बांधून त्यावर चालले. ३५ वर्षीय निक ५८८ फुटांच्या उंचीवर डोळ्यांवर पट्टी बांधून काही अंतर चालले. एका इमारतीची उंची जास्त असल्याने दोर वरच्या दिशेने १९ अंशांवर बांधला होता. अमेरिकेत शिकागो नदीवर रविवारी निक वॉलेंडा यांनी पाहणाऱ्यांचे अक्षरश: ठोके चुकवले. शिकागोसारख्या नदीच्या दोन्ही बाजूने किनाऱ्यावर उभ्या दोन गगनचुंबी इमारतींना जोडणाऱ्या दोरखंडावर ते चालत गेले.
- निक यांचे पणजोबा कार्ल यांचा १९७८ मध्ये प्युर्टो रिकोमध्ये १२१ फुटांवरून पडल्याने मृत्यू झाला.
- निकने १९९९ मध्ये पत्नी एरेनडिरास ३० फूट उंच तारेवर उभे राहून लग्नासाठी प्रपोज केले होते.
यशाची कारणे
- आईच्याहातचे बूट : निकयांचे बूट त्यांची आई डेलीलाह स्वत: तयार करते. शिकागोसाठी तिने दोन जोड्या बनवल्या होत्या.
- संतुलनासाठी: २४फूट लांब आणि किलो वजनी स्टेनलेस स्टीलचा गज हातात असतो.
- दोरी: लोखंडापासूनतयार, ते इंच जाड.