आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्शाच्या आधारे टाईम मशीन सांगेल 8 वर्षांचे भविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भविष्यातील आपली 8 वर्षे कशी असतील, हे तंतोतंत सांगणारे ‘टाइम मशीन’ तयार केल्याचा दावा इराणमधील अली राजेघी (27) या शास्त्रज्ञाने केला आहे. ‘द आर्याएक टाइम ट्रॅव्हलिंग मशीन’ या नावाने राजेघीने याचे पेटंटही मिळवले आहे.

आपल्या नावे 179 पेटंट असल्याचा राजेघींचा दावा आहे. इराणच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक इन्व्हेशन्सचे ते एमडी आहेत. ‘द टेलिग्राफ’ने इराणी माध्यमांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. मात्र, यात सखोल माहिती देण्यात आलेली नाही. हे मशीन भविष्यालाच आपल्यासमोर सादर करते, असे वृत्तात नमूद आहे.

98 टक्के सत्य भविष्य!
या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्पर्श करताच 98 टक्के तथ्यांश असलेले भविष्य ते सांगेल. या भविष्याच्या प्रिंटआऊटही काढता येतील. हे उपकरण लॅपटॉपच्या बॅगमध्येही सहजपणे नेता येईल.