आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे बाप... विमानात साप; 370 प्रवाशांना आकाशात फुटला घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - सहसा साप हे दाट झाडांमध्ये आणि पाण्यात आढळतात. मात्र, सिंगापूरहून टोकियोकडे निघालेल्या विमानात साप दिसल्याने शेकडो प्रवाशांची भंबेरी उडाली आणि विमान सिडनी विमानतळावर उतरवावे लागले.

सिडनी विमानतळाच्या प्रवक्त्या म्हणाल्या, की रविवारी सिंगापूरहून टोकियोकडे जाणा-या विमानाच्या दारात विमानातील कर्मचा-यांना एक साप अढळला. साधारण 20 सेंटीमीटर लांब आणि बॉलपेन एवढा जाड हा साप होता. त्यावेळी विमानात 370 प्रवाशी होती. विमानात साप असल्याची बातमी कळाल्यानंतर सगळ्यांनाच घाम फुटला. त्याचवेळी सिडनी विमानतळावर विमान उतरवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना रात्रभर हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला.

सापाला पकडल्यानंतर सोमवारी सकाळी 7.15 वाजता विमान पुढील प्रवासाला निघाले. विमानात आढळलेला साप हा मुख्यतः आशिया खंडात सापडतो.

विमानात साप आढळण्याची ही पहिली घटना नाही. याआधी जानेवारी महिन्यात तीन मीटर लांबीचा साप विमानात सापडला होता.