आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tipu Sultan Ring Auction News In Marathi, Ram, London

टिपू सुलतानच्या अंगठीवर ‘राम’; चार तोळ्यांच्या अंगठीची 1.43 कोटीत विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- म्हैसूर संस्थानाचा 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतान ‘राम’ असे नाव कोरलेली अंगठी वापरत असे. याच अंगठीचा 1.45 लाख पाउंड म्हणजेच 1.43 कोटी रुपयांत लिलाव झाला आहे. खरेदीदाराची ओळख गुप्त असली तरी त्याने अनुमानित किमतीपेक्षा 10 पट रक्कम मोजून ही अंगठी आपल्या नावे केली.

सेंट्रल लंडनच्या क्रिस्टी लिलावगृहानुसार या अंगठीचे वजन 41.2 ग्राम आहे. त्यावर देवनागरी लिपीत ‘राम’ नाव कोरले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात सन 1799 मध्ये र्शीरंगपट्टणममध्ये टिपूचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेह हाती लागल्यानंतर बोटातून ही अंगठी काढून घेतलेली असावी, असे बीबीसीने म्हणणे आहे.

मुस्लिम राजाच्या अंगठीवर हिंदू देव रामाचे नाव आश्चर्यजनक व तितकेच वादग्रस्त असल्याचे क्रिस्टीजने सांगितले. टिपू सुलतान यांना ‘टायगर ऑफ म्हैसूर’ या नावानेही ओळखले जाई. म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांचे धाकटे पुत्र असलेले टिपू हे लढवय्या राजा, विद्वान व कवीही होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा विरोध झुगारून लिलाव....