आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिस्ता जलवाटप, सीमाप्रश्नी सहकार्य करू, सुषमा स्वराज यांची बांगलादेश दौर्‍यामध्ये ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सदिच्छा व मैत्रीचा संदेश देतानाच तिस्ता नदी जलवाटप तसेच सीमाप्रश्न सोडवण्याची ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशला दिली. गुरुवारी द्विपक्षीय चर्चेत त्यांनी शेजारी देशाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
जलवाटप तसेच सरहद्दीचा मुद्दा याविषयीचा प्रस्ताव संसदीय समितीसमोर आहे. समितीकडून हिरवा कंदील मिळताच दोन्ही देशांतील नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान शेख हसीना व परराष्ट्र मंत्री हसन महेमूद अली यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ही चर्चा अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक झाल्याचे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिला दौरा म्हणून बांगलादेशची निवड केली. भारताच्या राष्ट्रीय प्रश्नाशी संबंधित मुद्दय़ांवर त्यांनी या दौर्‍यात भर दिल्याचे सांगण्यात आले.

व्हिसा नियमांत शिथिलता : बांगलादेशींना बहुद्देशीय व्हिसा देण्याचा भारताने निर्णय घेतला असून 13 वर्षांखालील तसेच 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या बांगलादेशी नागरिकांनाही भारतात येण्यासाठी व्हिसा दिला जाईल. या शिवाय व्हिसाची मुदत एक वर्षाच्या ऐवजी पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत बांगलादेशला अतिरिक्त 100 मेगावॉट वीजदेखील उपलब्ध करून देणार आहे, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.