आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होते सुप्रसिद्ध टायटॅनिक जहाज, बघा आतापर्यंत न बघितलेली छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या साऊथ हॅम्पटन येथून न्युयॉर्कला जाण्यासाठी निघालेले टायटॅनिक जहाज 15 एप्रिल 1912 रोजी समुद्रात बुडाले. व्हाइट स्टार लाइन कंपनीचे हे 52, 310 टन वजनी जहाज 10 एप्रिल रोजी निघाले होते. 14 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी विशाल हिमावर जहाज आदळले. त्यानंतर केवळ 2 तास आणि 40 मिनिटांत जहाज समुद्रात बुडाले. या जहाजावर 2,224 प्रवासी होते.
टायटॅनिकशी संबंधित काही रंजक माहिती
टायटॅनिकच्या तिकीटाचा दर
फस्ट क्लास- सुमारे 2.60 लाख रुपये
सेकंड क्लास- सुमारे 1 लाख रुपये
थर्ड क्लास- 1800 रुपये
या जहाजावर 13 कपल्स हनिमुन सेलिब्रेशनसाठी निघाले होते.
टायटॅनिकच्या शिटीचा आवाज 11 मैल दूरवर ऐकू येत होता.
याचे इंजिन चालविण्यासाठी दररोज 825 टन कोळसा लागत होता.
जहाजाच्या निर्माण कार्यात 30 लाखांपेक्षा जास्त खिळ्यांचा वापर करण्यात आला होता.
यात चार इलिव्हेटर्स होते. यातील तीन फस्ट क्लासमध्ये तर एक सेकंड क्लासमध्ये होता.
37 किलोमीटर (20 नॉट्स) या गतीने चालणाऱ्या टायटॅनिकला थांबविण्यासाठी इंजिन उलट्या दिशेने चालवावे लागत होते. त्यानंतर सुमारे अर्धा मैल अंतरावर जहाज थांबत असे.
पुढील स्लाईडवर बघा छायाचित्रे....