आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनसह पाकला प्रत्युत्तर देणे गरजेचे - व्ही. के. सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- सीमारेषेवर चीनचे वाढते अतिक्रमण आणि पाककडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन याचे प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत भारताचे माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी व्यक्त केले. तुम्ही काहीही केले तरी आम्ही उत्तर देणार नाही, असा संदेश गेल्यास परिस्थिती बिकट बनण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या अण्णा हजारे यांच्यासह व्ही. के . सिंह हे अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्या वेळी सिंह यांनी हे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या सीमारेषेसंदर्भात इतरही अनेक मुद्दे आहेत. मात्र, आपण काहीच करत नाही, असा संदेश जाणेही योग्य नसल्याचेही सिंह या वेळी म्हणाले. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात अपयश आले तर ते सीमारेषेवर भलताच गोंधळ घालू शकतात. त्यांना कडक संदेश जाणे गरजेचे असल्याचे सिंह या वेळी म्हणाले. चीनच्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर काम होण्याची आवश्यकता असल्याचे सिंह यांनी सांगितले. एखादे पाऊल का उचलावे किंवा का उचलू नये, याची त्यांना जाणीव होणे गरजेचे असल्याचेही सिंह यांनी सांगितले.