आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tobacco Best For Cancer Treatment News In Marathi

होय खरं आहे... कर्करोगावर तंबाखू रामबाण उपाय ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचे आजवरचे गृहीतक नव्या संशोधनाने खोटे ठरवले आहे. उलट तंबाखूमध्ये असलेला विशिष्ट घटक कर्करोगाच्या हानिकारक पेशींसाठी कर्दनकाळ ठरतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
ला ट्रोबे विद्यापीठातील अणुविज्ञान विभागातील संशोधकांनी तंबाखूच्या फायदेशीर घटकांचा अभ्यास केला. त्यातून तंबाखू पूर्णपणे वाईट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर तंबाखूच्या फुलांमध्येदेखील बुरशी आणि रोगजंतू यांना नष्ट करण्याची ताकद असते. त्याबरोबरच कर्करोगाच्या पेशींनादेखील ते नष्ट करू शकते, असे दिसून आले आहे. तंबाखूमधील विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थकणाला एनएडी-1 असे नाव देण्यात आले आहे. तंबाखूतील हा घटक निश्चितपणे रोगप्रतिबंधक ठरतो, याविषयी आमच्या मनात कसलीही शंका नाही. त्याचा फायदा मानवी शरीरातील कर्करोगावरील उपचारासाठी होऊ शकतो, असे प्रकल्पातील प्रमुख संशोधक मार्क हुले यांनी सांगितले. दरम्यान, तंबाखूचा काही फायदा असू शकतो, असे सांगणारे हे बहुदा पहिलेच संशोधन ठरले आहे.
रक्तचाचणीतून कर्करोगाचे लवकरच अचूक निदान
वॉशिंग्टन - लवकरच कर्करोगाचे तत्काळ निदान करणारी साधी-सोपी पद्धती उपलब्ध होणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे. या प्रयोगात पन्नास टक्के व्यक्तींचे निदान अचूकपणे करण्यात संशोधकांना यश मिळाले.
एनएडी-1 चे नेमके कार्य कसे ?
एनएडी हा तंबाखूमधील एक प्रतिबंधात्मक सूक्ष्मकण आहे. तो त्वचेमध्ये दडलेल्या कर्करोगाच्या पेशींना बाहेर घालवून देण्याचे काम करतो. ही प्रक्रिया एखाद्या स्फोटासारखी असू शकते. गंमत म्हणजे एनएडीच्या मार्फत विशिष्ट घटक तयार केले जातात. ते कर्करोगाच्या वाईट पेशींसाठी जणू अंत्यभोजन असते. ते खाल्ल्यानंतर त्यांचा नायनाट होतो. चांगल्या पेशींना मात्र त्याचा काहीही धोका नसतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रेलियन कंपनीत प्रयोग
मेलबर्न येथील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील हेक्झिमा या कंपनीमध्ये सध्या एनएडी-1 ची चाचणी घेतली जात आहे. हा घटक किती गुणकारी आहे, हे पूर्ववैद्यकीय स्वरूपात जाणून घेतले जात आहेत. त्यातील निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आहेत. मात्र, तूर्त त्याचे स्वरूप प्राथमिक अभ्यासातील आहे. अंतिम निष्कर्ष अद्याप बाकी आहे.