आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today In 1945 America Destroyed Japan With Nuclear Bomb

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अणुबॉम्बमुळे झालेला विनाशः लाखो लोकांचे प्राण घेऊन अमेरिकेने घेतला बदला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसरे महायुद्ध अतिशय विध्‍वंसकारी घटनेनंतर थांबले. अमेरिकेने जपानच्‍या दोन शहरांवर अणुबॉम्‍ब टाकले होते. अण्‍वस्‍त्रांचा हा पहिलाच प्रयोग होता. या हल्‍ल्‍यात लाखो निरपराध लोकांचा मृत्‍यू झाला. अणुबॉम्‍ब नागरी वस्‍त्‍यांवर पाडण्‍यात आले होते. 68 वर्षांपूर्वी याच दिवशी (6 ऑगस्ट) हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब आणि त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी नागासाकिवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.

अमेरिकेचा या हल्‍ल्‍यामागे दुहेरी हेतू होता. एक म्‍हणजे, जपानला धडा शिकविण्‍याचा आणि दुसरा रशियाला इशारा देण्‍याचा. अमेरिकेचे अध्‍यक्ष हॅरी ट्रूमन यांनी 1945 च्‍या उन्‍हाळ्यात झालेल्‍या पॉट्सडॅम शांती संमेलनादरम्‍यान एक सूपर शस्‍त्र गवसल्‍याचा दावा केला होता. परंतु, रशियाचे अध्‍यक्ष जोसेफ स्‍टॅलिन यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यानंतर काही दिवसांनीच हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्‍ब पाडण्‍यात आले आणि संपूर्ण जगाला मोठा धक्‍का बसला.