आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल पुरस्कारांचे आज स्वीडनमध्ये वितरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम - भारतातील बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी, पाकिस्तानमधील मलाला युसूफझई यांच्यासह ११ मान्यवरांना बुधवारी (१० डिसेंबर) नोबेल पुरस्कार प्रदान केला जाईल. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि नॉर्वेअन ओस्लो येथील भव्य कार्यक्रमात त्यांना नोबेल पुरस्कार प्रमाणपत्र आणि पारितोषिक स्वरूपातील रोख रक्कम प्रदान करण्यात येईल.

सत्यार्थी आणि युसूफझई यांना विभागून नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कारासाठी त्यांना ओस्लो येथील कार्यक्रमात संयुक्तरीत्या १.१ दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम दिली जाईल. पुरस्कार वितरण समारंभासाठी सत्यार्थी हे त्यांची पत्नी सुमेधा, मुलगा व स्नुषेसह सोमवारी ओस्लोत दाखल झाले. जगात सर्वश्रेष्ठ समजला जाणारा हा पुरस्कार भारतातील लहान मुलांसाठी अर्पण करेन. तसेच हा पुरस्कार भारतातील जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया कैलाश सत्यार्थी यांनी पुरस्कार वितरणाच्या पूर्वसंध्येला पीटीआयशी बोलताना दिली.