आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोफगोळ्याने रोखला बुलेट ट्रेनचा सुसाट वेग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- दुसर्‍या महायुद्धात स्फोट न झालेला तोफगोळा जपानमधील बुलेट ट्रेनच्या मार्गाहून काही मीटर अंतरावर आढळला आणि बुलेट ट्रेनच्या सुसाट वेगाला अचानक ब्रेक लागला.

दुसर्‍या महायुद्धात वापरलेला, परंतु स्फोट न झालेला हा तोफगोळा आढळताच रेल्वे कर्मचार्‍यांची धावाधाव झाली, बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. हा तोफगोळा नष्ट करण्यात आल्यानंतरच बुलेट ट्रेन पुन्हा गतिमान झाली. उत्तर टोकियोतील रेल्वे मार्गाजवळ हा तोफगोळा आढळून आल्यामुळे 53 शिंकांसेन बुलेट ट्रेनसह जवळपास 150 रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सुमारे 90,000 लोकांना त्रास सहन करावा लागला. अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात जपानवर प्रचंड बॉम्बफेक आणि तोफगोळ्यांचा मारा केला होता.