आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomas Brunegård New Presiden Of World Newspaper Association

जागतिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्‍यक्षपदी टॉम्स ब्रुनेगार्ड यांची निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - टॉम्स ब्रुनेगार्ड यांची वॅन-इफ्रा या जगातील वृत्तपत्रे व वृत्तपत्र प्रकाशकांच्या संघटनेच्या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

बँकॉक येथे दोन ते पाच जून दरम्यान 'वॅन-इफ्रा' संघटनेची वार्षिक बैठक पार पडली. त्यात ब्रुनेगार्ड यांची दोन वर्षांसाठी संघटनेच्या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली आहे. ते स्वीडनमधील स्टॅम्पनी माध्‍यम समुहाचे अध्‍यक्ष आहेत. यापूर्वी भारताचे जकॉब मॅथ्‍यू हे वॅन-इफ्राचे अध्‍यक्ष होते. बहुमाध्‍यम व बहुचेहरा झालेल्या माध्‍यम उद्योगासाठी मी भविष्‍यात योगदान देऊ इच्छितो. वॅन-इफ्राचे जे मुख्‍य उद्देश म्हणजे संरक्षण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रसार, स्वायत्तता जपण्‍यासाठी कार्य करणार असल्याचे ब्रुनेगार्ड यांनी सांगितले.


माध्‍यम उद्योगासाठी नवे उपक्रमांची आखणी करणे, जह‍िरातदार, प्रक्षेपक, डिजिटल माध्‍यम या सर्वांच्या मध्‍ये सहकार्याची भावना वाढवणे, युरोप व उत्तर अमेरिकेत संघटनेची भूमिका सक्षम करणे अशी कार्य ब्रुनेगार्ड आपल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत करणार आहेत. दरम्यान इतर पाच सदस्‍यांचीही निवड करण्‍यात आली. यात अ‍ॅलेससँड्रो बोमपिअरि, लिएम कवाग, लुईस इन् रिक्वेझ निस्टाल, सेझर पेरिझ, इक्वेडोरचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. बैठकी दरम्यान झाफर अब्बस ( द डॉन, पाक), संजना हत्तोतूवा (श्रीलंका), व सिध्‍दार्थ वरदराजन( द हिंदू, भारत) यांची भाषण झाली.