आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tony Abbott Warns Of Lengthy Hunt Of Missing MH370 Search

बेपत्ता MH370 हायजॅक; कंधारमध्ये तालिबानींच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालांलपूर- मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता असलेले विमान MH370 बाबत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तान- अफगणिस्तानाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कंधारमध्ये गेल्या एक महिन्यांपासून बेपत्ता असलेले MH370 उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे विमान तालिबानींनी हायजॅक केल्याचा दावा रशियातील एका वृत्तपत्राने केला आहे. 'द मॉस्कोवस्काई कोम्सोमोलेट्स' या वृत्तपत्राने गुप्तचर विभागाच्या एका सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बेपत्ता असलेल्या MH370 च्या वैमानिकाची यात कोणतीही चूक नाही. गेल्या महिन्यात 8 मार्चला बेपत्ता झालेले मलेशियन विमान MH370 चे अपहरण झाले आहे. एका अज्ञात दहशतवाद्याने विमानाचे अपहरण केले आहे. वैमानिकाची यात कोणतीही चूक नसून दहशतवाद्याच्या इशार्‍यावर तो काम करत होता. 'हिच' असे दहशतवाद्याचे नाव असून त्याने अफगानिस्तानात कंधारमध्ये MH370 उतरविण्यात आले आहे. डोंगराळ भागात विमानाचे हार्ड लॅंडिंग करण्‍यात आल्याने विमानाचे एक पंख तुटला आहे. सर्व प्रवाशी सुरक्षित असून दहशतवाद्यांनी सगळ्यांना वेठीस धरले आहे.

रशियन वृत्तपत्राने गुप्तचर एजन्सीचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. 'MH370'ला पाकिस्तानातील एका बंकरमध्ये लपवून ठेवले आहे. मात्र, रशियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त एक अफवा असल्याचे समजून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

मलेशियन MH370 बेपत्ता झाल्यानंतर 16 मार्चला 'द मॉस्कोवस्काई कोम्सोमोलेट्स'मध्ये संबंधित वृत्त प्रसिद्ध झाले होते.
(Image - Not Actual)

पुढ‍ील स्लाइड्‍सवर वाचा, बेपत्ता मलेशियन विमानाच्या सहाय्यक वैमानिकाने केला होता फोन...