आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर गेलेल्या टूथब्रशला लिलावात 4.86 लाखांची बोली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसर्‍यांनी वापरलेला टूथब्रश खरेदी करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे मोजाल? विशेषत: तो टूथब्रश चंद्रावर जाऊन आला असेल तर? या ब्रशच्या लिलावाची सुरुवात 4.86 लाख रुपयांनी होईल. हा ब्रश अमेरिकन वंशाचे अंतराळवीर बज एल्ड्रिन यांचा आहे. अपोलो 11 यानाने चंद्रावर जाणारे ते दुसरे अंतराळवीर होते. चंद्रावर त्यांनी 21 जून 1969 रोजी मिशन कमांडर नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर पाऊल ठेवले होते. अंतराळ मोहिमांसंबंधी वस्तूंचा लिलाव करणार्‍या हेरिटेज ऑक्शन संस्थेने अपेक्षा व्यक्त केली आहे की, या टूथब्रशसाठी 13 लाख रुपये मिळू शकतात. तर एल्ड्रिनने चंद्रावर जाताना घातलेल्या कानातल्यांसाठी 19 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. अंतराळातील संस्मरणीय वस्तूंचा लिलाव 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तुम्हीही अपोलोतील अंतराळवीर रिचर्ड गॉर्डनचा कंगवा, चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले चार्ट आणि नील आर्मस्ट्राँग यांच्या बालपणीचे खेळण्यातील विमान, आर्मस्ट्राँगचा स्पेस सूट, अपोलो 17 चे आर्मरेस्ट (ज्यावर मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.) इत्यादींसाठी बोली लावू शकता.