आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्‍या जागतीक स्‍पर्धेत भारताला नाही स्‍थान, पहिल्या 200 मध्ये नाही एकही विद्यापीठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महासत्ता होण्‍यासाठी भारत प्रयत्‍न करत आहे, मात्र, जगभरातील विद्यापीठाच्‍या स्‍पर्धेत एकाही विद्यापीठाला पहिल्‍या 200 मध्‍ये स्‍थान मिळवता आलेले नाही. जगभरातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पहिल्या 200 विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ स्थान प्राप्त करू शकले नाही.
आयआयटी-मुंबई 222 व्या क्रमांकावर
देशातील प्रतिष्ठाप्राप्त आयआयटी शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी-मुंबई (222), आयआयटी-दिल्ली(२३५)स्थान प्राप्त झाले आहे, असे क्वकरेली सायमंड्स(ओएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारीने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे. जागतिक विद्यापीठाच्या प्रसिद्धी झालेल्या यादीत आयआयटी-कानपूर(300) तर आयआयटी-मद्रास(322) आणि आयआयटी-खरगपूरचा 325 वा क्रमांक लागला आहे. भारतातील शिक्षण संस्थांचा सहभाग 11 वरून 12 झाला आहे. 700 अव्वल विद्यापीठांमध्ये 400 पेक्षा कमी रँकच्या विद्यापीठांमध्ये दिल्ली, आयआयटी-रुरकी, आयआयटी-गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, बनारस हिंदू, पुणेचा समावेश आहे.

पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या जगातील टॉप 10 विद्यापीठाविषयी...