आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 200 University News In Marathi, Divya Marathi, Education

जगातील पहिल्या २०० मध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही, पहिल्या क्रमांकावर अमेरिकेची एमआयटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगभरातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(एमआयटी) विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पहिल्या २०० विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ स्थान प्राप्त करू शकले नाही. देशातील प्रतिष्ठाप्राप्त आयआयटी शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी-मुंबई(२२२), आयआयटी-दिल्ली(२३५)स्थान प्राप्त
झाले आहे, असे क्वकरेली सायमंड्स(ओएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारीने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.

जागतिक विद्यापीठाच्या प्रसिद्धी झालेल्या यादीत आयआयटी-कानपूर(३००) तर आयआयटी-मद्रास(३२२) आणि आयआयटी-खरगपूरचा ३२४ वा क्रमांक लागला आहे. भारतातील शिक्षण संस्थांचा सहभाग ११ वरून १२ झाला आहे. ७०० अव्वल विद्यापीठांमध्ये ४०० पेक्षा कमी रँकच्या विद्यापीठांमध्ये दिल्ली, आयआयटी-रुरकी, आयआयटी-गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, बनारस हिंदू, पुणेचा समावेश आहे.

अमेरिकेतील ५१ विद्यापीठे
सर्वोत्कृष्ट २०० विद्यापीठांमध्ये ३१ देशांतील शिक्षण संस्थांचा समावेश आहे. अमेरिकेने ५१ संस्थांसह वरचष्मा राखला आहे. यानंतर िब्रटन(२९),जर्मनी(१३),नेदरलँड(११),कॅनडा(१०), जपान(१०) आणि ऑस्ट्रेलियातील ८ विद्यापीठांचा समावेश आहे. एमआयटीनंतर इंपिरियल आणि केंिब्रज विद्यापीठाने समान दुसरे स्थान प्राप्त केले. एमआयटी सलग तिसऱ्या वर्षी अव्वल राहिली. पहिल्या दहा विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, नोकरीच्या संधी, स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय फॅकल्टीच्या सुिवधा चांगल्या आहेत.