आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्टचे 60 वर्षीय सहसंस्‍थापक आहेत जगातील सर्वात श्रीमंत 'बॅचलर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- मायक्रोसॉफ्टचे सह-संस्‍थापक 60 वर्षीय पॉल अ‍ॅलन जगभरातील सर्वाधिक श्रीमंत बॅचलर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत 'इलिजिबल बॅचलर्स'ची यादी नुकतीच जाहीर करण्‍यात आली आहे. त्‍यात अ‍ॅलन यांचे नाव अग्रस्‍थानी आहे. त्‍यांच्‍याकडे 15.3 अब्‍ज डॉलर्स्स (जवळपास 949.37 अब्‍ज रुपये) एवढी संपत्ती आहे. वेल्‍स इंटेलिजंस कंपनी 'वेल्‍थ एक्‍स'ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

कंपनीने यादीतील सर्व बॅचलर्सच्‍या मालमत्तेचे आकलन प्रॉपर्टी व्‍हॅल्‍यूएशन मॉडेलच्‍या आधारे केले आहे. यात श्रीमंत बॅचलर्सचा खासगी आणि सार्वजनिक व्‍यवसायही जोडण्‍यात आला आहे. अर्थात, या अहवालात एक मु्द्दा स्‍पष्‍ट करण्‍यात आला आहे. तो म्‍हणजे, यादीत समाविष्‍ट सर्व लोक तरुणच असतील आणि ते जोडीदाराचा शोध घेत आहेत, असे आवश्‍यक नाही. परंतु, ते योग्‍य बॅचलर्स आहेत. यादीतील टॉप टेन बॅचलर्सचे सरासरी वय 54.5 वर्षे आहे. सर्वाधिक कमी वयाचे बॅचलर म्‍हणून 31 वर्षी स्‍कॉट डंकन यांचे नाव या यादीत आहे.

पुढे वाचा... टॉप टेन श्रीमत बॅचलर्सच्‍या यादीत कोण आहेत...