आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिला होणार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या सीईओ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरिसा मायर यांनी याहूच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच फॉर्च्यून 500 कंपन्यांची धुरा सांभाळणा-या महिलांची संख्या 19 झाली. आठ व्यावसायिक महिलांकडे या समूहाच्या भावी सदस्य म्हणून पाहिले जात आहे. या सर्वच महिला चाळिशीच्या आतील आहेत. तंत्रज्ञानाशी निगडित आहेत. त्यांचे ऑनलाइन व्यवसाय कोट्यवधींचा नफा मिळवून देत आहेत. अमेरिकेतील ‘डायव्हर्सिफाइड’ फर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार जसजशी फॉर्च्यून 500 च्या व्यवस्थापनात महिलांची संख्या वाढते आहे तसतसा महिला-पुरुषांच्या प्रमाणात असलेला फरक कमी करण्याबाबत गुंतवणूकदारांचा दबाव वाढतो आहे.
पूजा शंकर, ‘पियाजा’- आयआयटी कानपूर येथून संगणकशास्त्राच्या पदवीधर, मेरीलँड विद्यापीठातून उच्च शिक्षण. फेसबुक, ओरॅकल, कॉसमिक्समध्ये कामाचा अनुभव. स्टॅनफोर्ड येथून एमबीए केल्यावर 2011 मध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ‘पियाजा’ ही कम्युनिटी वेबसाइट तयार केली. 2.5 लाख युजर असलेली ही वेबसाइट 35 कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे. स्टॅनफोर्डच्या आयओएस डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी अ‍ॅपल आयट्यून्सने पूजासोबत करार केला आहे.
क्लारा शिह, हियरसे सोशल- 29 व्या वर्षी स्टारबक्सच्या संचालक मंडळावर येण्याचे निमंत्रण मिळाले. फेसबुकचे पहिले बिझनेस अ‍ॅप्लिकेशन फेसकनेक्टर तयार केले. ब्रँडच्या स्थानिक विक्री केंद्राशी निगडित सोशल मीडिया कंपनी त्यांनी स्थापन केली आहे.
ट्रेसी चाऊ, पिनटरेस्ट- गुगल व फेसबुकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. इन्टरॅक्टिव्ह वेबसाइट क्वोरा डॉट कॉम तयार केली. त्या पिनटरेस्टमध्ये रुजू झाल्या.
हेल टोको, रॉक हेल्थ- हॉर्वर्डच्या पदवीधर. इंटेल व अ‍ॅपलमध्ये कामाचा अनुभव. कर्करुग्णांसाठी योगासन उपचार पॅकेज तयार केले. रॉकहेल्थ संस्था आॅनलाइन हेल्थ प्रोग्राम तयार करते. त्यांचे भागीदार तथा पती जेफ यांना फेसबुकमध्ये कामाचा अनुभव आहे.
ली बुश्के , टास्क रॅबिट- आयबीएममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाचा अनुभव. फेसबुकसाठी अनेक प्रोजेक्ट व टास्क रॅबिट वेबसाइट तयार केली. यामार्फत अनेक लहानसहान कामे केली जातात.
अ‍ॅलेक्सा वॉन, लर्न वेस्ट- न्यूयॉर्कमध्ये लर्न वेस्ट कंपनी स्थापन केली. ही कंपनी महिलांना ऑनलाइन गुंतवणुकीचे सल्ले देते.
जेसिका मे, इन डिनेरो- 2009 मध्ये स्थापन झालेल्या इनडिनेरो डॉट कॉम वेबसाइटवर व्यावसायिक अर्थकारणाची माहिती मिळवू शकतात.
निनिएन वांग, मिंटेड- गुगलमध्ये कार्यरत असताना त्यांनी 29 पेटंट मिळवले. त्यांनी तयार केलेल्या मिंटेड डॉट कॉम वेबसाइटवर पेपर प्रॉडक्ट्सची खरेदी-विक्री केली जाते.