वॉशिंग्टन - अमेरिकी परराष्ट्रमंत्री चक हेगल तीन दिवसांच्या भारत दौर्यासाठी बुधवारी येथून रवाना झाले. हेगल आपल्या दौर्यात भारत-अमेरिका संरक्षण संबंध बळकट करण्यावर भर देतील. पंतप्रधान मोदी यांची भेट घेणारे हेगल अमेरिकेचे दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत. त्याआधी जॉन केरी यांनी मोदींशी चर्चा केली आहे. हेगल अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. पेंटागॉनचे माध्यम सचिव रियर अॅडमिरल जॉन किर्बी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही करार करणे हा या दौर्याचा उद्देश नव्हे तर संबंध बळकट करण्यासाठी त्याची आखणी केली आहे. लष्करी प्रकरणांचे परराष्ट्र उपमंत्री पुनीत तलवार हेगल यांच्यासोबत असतील.
चर्चेचे मुद्दे : आशिया प्रशांत प्रदेशात भारत आणि अमेरिकेचे हितसंबंध भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव, व्यापार, संयुक्त प्रकल्प व नव्या तंत्रज्ञानासाठी सहकार्य.