आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोरँटोत तापमान उणे 15 सेल्सियसच्या खाली, बर्फवृष्टीमुळे नाताळच्या आनंदावर पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गस्टा (अमेरिका )-नाताळ सणाच्या ऐन पूर्वसंध्येला अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्ससह युरोपात हिमवादळ आले. शरीर गोठवणारी थंडी आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो लोकांचा नाताळचा आनंदही हिरावला.हजारो विमान उड्डाणे रद्द झाल्याने आपापल्या गावी निघालेल्या लोकांना विमानतळावरच नाताळ साजरा करण्याची वेळ आली. अमेरिका व कॅनडात हिमवादळामुळे 24 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ब्रिटन,फ्रान्समध्ये रस्ते,रेल्वे आणि हवाई वाहतूक पुरती कोलमडली आहे.
अमेरिकेच्या मध्य आणि ईशान्य भागाला वादळाचा तडाखा बसला असून मंगळवारी देशभरात 7 हजार विमान फे-या रद्द कराव्या लागल्या.प्रचंड बर्फवृष्टी,कडाक्याची थंडी, दाट धुके यामुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. कॅनडात अँन्टारिओमध्ये थंडीमुळे जनरेटर लावल्यानंतर त्यातून निघणाºया कार्बन मोनोक्साइडमुळे गुदरमल्याने दोन जण मृत्युमुखी पडले, तर क्युबेकमध्येही अशाच एका घटनेत तीन जण गुदमरून मृत्यू पावले. दाट धुके आणि हिमवादळामुळे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले.टोरँटोत तापमान उणे 15 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरले असून मंगळवारपासून सुमारे 90 हजार लोक अंधारात आहेत.अमेरिका,कॅनडात वीजपुरवठा पुरता कोलमडला आहे.