आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अमेरिकेत पुन्हा चक्री वादळाचा तडाखा, 10 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओकलाहोमा/ टेक्सास- अमेरिकेत पुन्हा एकदा भीषण चक्री वादळाने आणि आगीने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी आलेल्या या चक्री वादळाबरोबरच तुफानी पावसामुळे अमेरिकेतील 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ओकलाहोमा आणि येथील मूरे परिसरात आलेल्या वादळामुळे किमान पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच किमान 50 जण जखमी झाले आहेत. मृतांत एका आईचा व तिच्या बाळाचा समावेश आहे. दहा दिवसापूर्वी आलेल्या वादळात किमान 91 लोक मारले गेले होते. शुक्रवारी दुपारी टेक्सासमधील दक्षिण पश्चिमी ह्यूस्टनमधील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील चार जवानांचा इमारतीचा काही भाग कोसळल्याने मृत्यू झाला. याचबरोबर सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुढे फोटोफीचर पाहा, अमेरिकेतील चक्रीवादळासंबंधित.... क्लिक करा...