आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेला टोर्नाडो चक्रीवादळाचा पुन्हा तडाखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन - अमेरिकेतील टोर्नाडो चक्रीवादळाने थैमान घातल्याच्या दुस-या दिवशी ह्युस्टन प्रांताला पुन्हा एकदा तडाखा दिला. त्यात ओकलाहोमा सिटीतील 5 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या चक्रीवादळात 24 नागरिकांचा मृत्यू झाला होता.


शुक्रवारी पुन्हा आलेल्या वादळातील मृतांत आई आणि बाळाचा समावेश आहे. ही घटना ओकलाहोमा महामार्गावर घडली. ही महिला कारमधून आपल्या मुलासह जाताना त्यांची गाडी वादळाच्या तडाख्यात सापडली. या दोघांसह पाच जणांचा वादळी घटनांत मृत्यू झाला, तर 14 जण जखमी आहेत. 20 मे रोजी आलेल्या वादळात 24 नागरिक ठार झाले होते. त्यात 10 मुलांचा समावेश होता. ओकलाहोमा सिटीतील विल रॉजर्स वर्ल्ड एअरपोर्टला वादळाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ खाली करण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित निवा-याच्या ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वादळाचा वेग काहीसा कमी झाल्याने काही भागात तात्पुरत्या निवा-याखाली असणा-या नागरिकांना हळूहळू बाहेर येण्याची परवानगी देण्यात येऊ लागली आहे.

विमानतळावर मात्र
वीजपुरवठा नाही. वीज नसल्याने प्रवाशांना प्रशासनाकडून योग्य ती सेवा उपलब्ध होऊ शकणार नसल्याने तूर्त त्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना करण्यात आली आहे.


अनेक समस्या
ओकलाहोम सिटीपासून 27 किलोमीटर अंतरावरील मुस्टांग शहरातील वीज केंद्र बंद पडले आहे. परिसरातही जवळपास हीच स्थिती आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाले आहे. विजेअभावी शाळकरी मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.


परिसरात पडझड
एल रिनो नावाच्या शहराला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. शहरातील इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, परंतु नेमके किती नुकसान झाल याची प्राथमिक माहितीदेखील अद्याप मिळू शकली नाही, असे मेयर मॅट व्हाइट यांनी सांगितले.


वादळात ड्राइव्ह टाळा
नागरिकांनी वादळी भागातून वाहनाने जाण्याचे टाळले पाहिजे. गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी आम्ही नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. नैसर्गिक आपत्ती अशी गोष्ट आहे, जेथे कोणत्याही प्रकारची सूचना करता येऊ शकत नाही. म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन ओकलाहोम हायवे गस्तीवर असलेल्या बेटसी रँडॉल्फ यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन ओकलाहोमचे मेयर मेरी फॉलीन यांनी केले.


कसा आहे वादळाचा वेग?
टोर्नाडो चक्रीवादळाचा वेग पूर्वेला ताशी 80 किलोमीटर असा आहे. गेल्या काही तासांपासून वादळी वारे वाहू लागले आहेत. यामुळे पूर्वेकडील शहरे आणि ओकलाहोमची उपनगरे मुरे, युकॉन, बेथनी यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.