लंडन - चिखलात रांगत जाणे. टोकदार जाळीपासून स्वत:चा बचाव करणे, लक्ष्यपर्यंत पोहोचण्यासाठी 25 अडथळे पार करणे. हे दृश्य आहे मध्य इंग्लंडच्या परटन येथे झालेल्या 'टफ गाय इव्हेंट'चे.यास जगातील सर्वात कठीण शर्यत म्हणून ओळखले जाते. स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. एका वृत्तानुसार या स्पर्धेत सुमारे 5 हजार लोकांनी सहभाग घेतला होता.शर्यतीत स्पर्धकांना उंच चढणे, खड्डे, थंड पाणी, आग, काळेकुट्ट सुरुंग आणि चिखल यासारख्या अडथळे पार करावे लागतात. 1987 साली सुरु झालेल्या या स्पर्धे करिता 600 एकर भागात रेस ट्रॅक तयार करण्यात आली आहे. त्याची लांबी 25 किमी आहे. स्पर्धेचे आयोजन बिली विल्सन करतात. सुरुवातीला यास 'मिस्टर माऊस' असे होते. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी टफ गाय इव्हेंटचे आयोजन केले जाते.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा जगातील सर्वात अवघड शर्यतीत कशा पध्दतीने स्पर्धक सामोरे जातात...