आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toyo Shibata, Japan's Grandmother Poet, Passes Away

जपानी आजीबाई कवयित्रीचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकिया - वयाच्या 92 व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात करणार्‍या जपानच्या बुजुर्ग कवयित्री टोयो शिबाटा यांचे रविवारी निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. टोकियोच्या उत्तरेकडील उत्सुनोमिया गावापासून जवळ असलेल्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा मृत्यू कोणत्याही वेदनेशिवाय अतिशय शांत स्थितीत झाला. आयुष्यात उशिराने लेखनास सुरुवात करणार्‍या शिबाटा यांनी वयाच्या शंभरीपर्यंत लेखनात सातत्य ठेवले होते.