नैरोबी- केनियातील पोकोट आदिवासींमध्येही हुंडा प्रथा आहे. फरक एवढाच आहे, की येथे मुलीच्या घरचे हुंडा देत नाहीत तर घेतात. विशेष म्हणजे हुंड्याच्या स्वरुपात पशुधन दिले जाते. काही वेळा एका मुलीसाठी वीस बकऱ्या, तीन उंट आणि दहा गायी दिल्याची घटनाही घडली आहे. यावेळी विशेष समारंभ आयोजित केला जातो. याला मुलीचा नारित्वातील प्रवेश समजला जातो.
नवरी मुलीलाच माहित नसते आज आपले लग्न आहे
पोकोट आदिवासींच्या मुलींना माहित नसते की काही दिवसांनी त्यांनी लग्न होणार आहे. मुलीचे आई-वडील लग्नाची बाब तिच्यापासून लपवून ठेवत असतात. कारण हे लग्न म्हणजे एक सौदा असतो. मुलीच्या बदली पशुधन दिले जाणार असते. ही बाब मुलीला समजली तर ती पळून जाईल, असा मातापित्याचा समज असतो. या समारंभासाठी बैलाची निवड केली जाते. त्याचा बळी दिला जातो. बरिंगो काऊंटीमधील मारीगेट वस्तीपासून 50 किलोमीटर दूर असलेल्या भागात नुकताच एक विवाह समारंभ पार पडला. येथे सुमारे 1,33,000 पोकोट आदिवासी राहतात.
होतात बालविवाह
या समारंभात लग्नासाठी जमलेल्या बहुतांश मुलींचे वय 14 वर्षांपेक्षा कमी असते. केनियात बालविवाहांवर कायदेशीर बंदी आहे. तरीही येथे सर्रास बालविवाह होतात. आदिवासींमध्ये त्यांचे रितीरिवाज चालतात. ते आपल्या परंपरांचे पालन करतात. लग्नाच्या दिवशी दुपारपासून दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत नवरी मुलीला उभे राहून गाणे गावे लागते. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठांच्या संरक्षणात नवरा मुलगा आणि मुलगी नृत्यही करतात.
पुढील स्लाईडवर बघा, पोकोट आदिवासींमध्ये नुकताच झालेला विवाह समारंभ...